कोरोना संसर्ग व स्तनपान – समज व गैरसमज

Advertisements

जागतिक स्तनपान सप्ताहाच्या निमित्ताने तसेच सध्याच्या करोना विषाणू संसर्गा मध्ये स्तनपाना बाबत नाशिकच्या प्रख्यात स्त्री रोग तज्ञ डॉ. क्षमा अघोर यांचे मार्गदर्शन.

१) करोना व्हायरस ब्रेस्ट स्मिल्क मधून ट्रान्समीट होतो का?

  • आतापर्यंतच्या अभ्यासामध्ये करोना व्हायरस ब्रेस्ट स्मिल्क मधून ट्रान्समीट होत नाही असे आढळून आले आहे.

२) करोना बाधित मातेने ब्रेस्टफीडिंग करावे का?

  • होय, कारण बेस्ट बिल्डींग मुळे होणारे जे फायदे आहेत आहेत ते होणाऱ्या तोट्यान पेक्षा पेक्षा जास्त बलवत्तर आहेत

३) करोना बाधित अशा मातेने ब्रेस्टफीडिंग करताना काय काळजी घ्यावी?

  • जसे की वारंवार साबणाने किंवा हॅन्ड सानिटीझर ने हात धुणे, मास्क वापरणे, मास्क जर ओलसर झाला तो ताबडतोब बदलणे,
    फिडिंग करत असताना खोकला आला तर तो टिशू वर गोळा करून ताबडतोब फेकून देणे.

४) फीडिंग करत असताना प्रत्येक वेळी breast धुणे गरजेचे आहे का?

  • जर खोकला आला आणि कपड्यांवर शिंतोडे पडले असतील तरच ते स्वच्छ करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळी स्वच्छ करत बसण्याची गरज नाही.

५) जर अशी आई खूपच आजारी असेल तर बाळाचे फिडींग कसे करावे?

  • अशावेळी फॉर्मुला फीड्स वापरावेत किंवा अगदीच शक्य नसेल तर गाईचे दूध दिले जावे.

६) आईचे दूध वाटीमध्ये काढून बाळाला देता येते का?

  • होय. दहा मिनिटाच्या आत जर असे दूध बाळाला देऊ शकत असू तर आपण ते बाळाला देऊ शकतो आणि जर जास्ती वेळ लागणार असेल तर हे दूध गरम करून आणि थंड करून पुन्हा बाळाला द्यावे कारण ब्रेस्ट मिल्क मध्ये हा व्हायरस ट्रान्समीट झालेला अजून दिसलेला नाही.

आवर्जून सांगावेसे वाटते की स्तनपान आणि आईचा बाळाला होणारा स्पर्श हे बाळाला अनेक रोगांपासून, मानसिक व्याधींपासून, कॅन्सरपासून, डायबिटीस पासून, वाचवू शकते . त्यामुळे बाळ व माता यांचा स्वास्थ्यासाठी स्तनपान अवश्य द्यावे.

डॉ. क्षमा अघोर

*या सर्व सल्ल्यासाठी डब्ल्यूएचओ (WHO) चा रेफरन्स वापरला आहे.

Leave a Reply

You cannot copy content of this page