जाणून घ्या बसण्याची व झोपण्याची सुयोग्य पध्दत

Advertisements

आजकाल सर्व वयोगटातील आबालवृद्धांना मानेचे.पाठीचे व कमरेचे दुखण्याचे विकार जडले आहेत. अगदी 12 ते 95 वर्ष या वयोगटातील रुग्ण हे मान ,पाठ,कंबरेच्या दुखण्याने त्रस्त आहेत.याची कारणमीमांसा केली असता सलग 8 ते 10 तास बसून काम करणे,अयोग्य पध्दतीने बसणे,झोपणे व व्यायामाचा अभाव ही कारणे प्रमुख आढळली.ऑफिसमधील बैठी कामे,कॉम्पूटर व लिखाण काम,मोबाईल वापरतांना मान पुढे वाकवून बसणे यामुळे मानेचे व पाठीचे दुखणे कमी वयातच जडतात व दैनंदिन जीवनात व्यत्यय आणतात.जर योग्य ती बसण्याची व झोपण्याची पध्दत वापरली व नित्यनेमाने व्यायाम केला तर आपण या दुखण्यापासून वाचू शकता.

डॉ.अजिंक्य भास्कर देसले ,अस्थी व सांधेरोग तज्ञ

काय करावे???

 1. बसण्यासाठी खुर्ची निवडतांना ती कमरेपासून ते खांद्यापर्यंत आधार देणारी असावी.बसतांना खुर्चीला टेकून ताठ बसावे.
 2. पाठीत पोक काढून अथवा पुढे वाकून बसू नये.बसतांना मागे सरकून व व्यवस्थित टेकून बसावे,पुढे सरकून बसू नये.
 3. दोन्ही हात नेहमी आधार देऊन खुर्चीच्या हातावर ठेवावे अथवा खुर्चीसमोरील टेबलवर आरामशीर ठेवावे.
 4. हात अधांतरी हवेत ठेऊन काम केल्याने मानेला व पाठीला अधिक ताण पडतो.
 5. दोन्ही पाय गुडघ्यातून 90°ला वाकवून आरामात जमिनीवर ठेवावे.गुडघे ताठ ठेऊन पाय ताणून बसू नये अथवा गुडघ्यातून अतिजास्त वाकवून खुर्चीखाली घेऊन बसू नये.
 6. कॉम्पूटर स्क्रीन नजरेच्या सरळ रेषेत हवी.स्क्रीनकडे बघतांना मान खाली वाकवू नये.यासाठी स्क्रीनची उंची वाढवून घ्यावी.
 7. सलग दोन तास बसून असल्यानंतर उठून काही साधे व्यायाम ,हालचाली करणे गरजेचे आहे.याने स्नायूंवर आलेला ताण कमी होतो.
 8. झोपतांना अतिशय नरम गादी वापरल्यास कंबर व पाठदुखी वाढू शकते.या साठी हार्ड फोम अथवा मेमरी फोमची (memory foam) गादी वापरावी,जी आपल्या शरीरानुसार आकार घेते व शरीराला ताण देत नाही.
 9. सतत जमिनीवर झोपल्यानेही अंगदुखी होऊ शकते.यामुळे सतत अतिशय कडक जागेवर झोपणेही टाळले पाहिजे.
 10. उशी वापरतांना खुप जाड वापरू नये.सरळ झोपतांना मानेला आधार देईल अशी टॉवेलच्या घडीएवढी जाड उशी योग्य आहे.एका कुशीवर झोपतांना उशीची जाडी इतकी असावी कि ज्यामुळे मान गादीला समांतर असेल.मान गादीकडे झुकलेली अथवा उंच झालेली नसावी.
 11. या बसण्याच्या व झोपण्याच्या योग्य पोश्चर (posture) बरोबरच व्यायाम व योग्य आहाराची गरज शरीराला असते.जेणेकरून स्नायू बळकट राहतात व शरीराला दुखापतीपासून वाचवता येते.

Dr. Ajinkya B. Desale MS,DNB(Ortho),MNAMS, PDCR Fellowship in Arthroscopy and Joint Replacement-Italy

Leave a Reply

You cannot copy content of this page