शरीरातील हाडे ही कडक असतात.. अतिशय मृदु भाषेत रुग्णांशी संवाद साधत त्यांच्या भावनांना समजावून घेऊन अचूकतेने या कडक हाडांचे उपचार करणारा डॉक्टर म्हणजे विशाल कासलीवाल. रुग्णांच्या सर्व शंकाकुशंकांना सोप्या व त्यांना समझेल अश्या भाषेत त्यांचे पूर्ण समाधान होई पर्यंत शांतपणे समजावणे हे डॉ. विशाल यांचे वैशिष्ठ्य.
उच्च शिक्षित घरात जन्म झालेल्या डॉ .विशाल कासलीवाल यांना रुग्णसेवेचे बाळकडू घरातूनच मिळाले. नाशिकमधील प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. अनिल कासलीवाल यांचे सुपुत्र विशाल यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण नाशिकच्या फ्रावशी अकॅडमीमधून घेतले. वैद्यकीय शिक्षणासाठी शहराबाहेर पडतांनाच परत नाशिक शहरात आपल्या जन्मभूमी मध्ये येऊन रुग्णांना सेवा देण्याचा निर्धार केला. एम.बी.बी.एस. नंतर एम.एस.(ऑर्थो)हि उच्च पदवी घेऊन २०१४ मध्ये नाशिक शहरातच ही सेवा आरंभली.
दरम्यान सांधेरोपण क्षेत्रातील नामवंत व मुंबईच्या ब्रीच कॅन्डी हॉस्पिटल मधील तज्ञ डॉ. अरुण मुलाजी यांच्यासोबत मुंबईत एक वर्षाच्या प्रशिक्षण कालावधीत १००० हून अधिक कॉम्पुटर नेव्हिगेशन सांधेरोपण शस्त्रक्रियांचा अनुभव घेतला व आपली नाशिकमधील सेवेची दिशा निश्चित केली. यानंतर डॉ. विशाल कासलीवाल यांनी दक्षिण कोरियामध्ये कॉम्पुटर नेव्हिगेटेड सांधेरोपण क्षेत्रातील जगातील नामवंत डॉ जीन योंग पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केले. तसेच पुण्यातील प्रख्यात डॉ .सचिन तपस्वी यांच्याकडे ऑर्थोप्लास्टी व ऑर्थोस्कोपी यांचीही फेलोशिप पूर्ण केली. या प्रगत शिक्षण व अनुभव घेऊन नाशिकमध्ये डॉ. विशाल यांनी आपले वडील बालरोगतज्ञ डॉ. अनिल कासलीवाल व पत्नी स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्रियांका कासलीवाल यांच्यासोबत गंगापूर रोड वरील कासलीवाल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना केली.
गत १० वर्षांमध्ये शेकडो यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर कॉम्पुटर नेव्हिगेटेड(computer navigated knee replacement) या अद्ययावत तंत्रज्ञानाद्वारे या आता कासलीवाल हॉस्पिटल येथे सांधेरोपण( जॉईन्ट रिप्लेसमेंट ) शस्त्रक्रिया होत आहेत. वाजवी दरातील गुडघे रोपण शस्त्रक्रिये सोबत येथे खुबा, मणका खांदा ,कंबर यावर देखील उपचार व सांधे बदल शस्त्रक्रिया नियमित रित्या केल्या जातात.
कॉम्पुटर नेव्हिगेटेड या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे गुडघे रोपण ही शस्त्रक्रिया अधिक अचूकपणे करता येते. त्यामुळे रुग्णांना त्याचा फायदा होतो.या पद्धतीमुळे शस्त्रक्रिया करताना अतिशय कमी रक्तस्त्राव होतो,हॉस्पिटल मध्ये देखील अधिक वेळ थांबावे लागत नाही व आपल्या दिनचर्ये ला पुन्हा लवकर सुरवात करता येते.
डॉ. विशाल कासलीवाल
कधी काळी गुडघे रोपण शस्त्रक्रिये बाबत अनेक गैसमजुती होत्या पण काही वर्षात तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे तसेच याबाबतच्या समाजातील जागरूकतेमुळे यात खूप बदल झाला आहे.त्यासोबत आता या शस्त्रक्रिया करण्यासाठी आरोग्य विमा देखील मिळू शकतो. ही शस्त्रक्रिया केल्या नंतर पुन्हा नियमित आयुष्य जगता येऊ शकते. या शस्त्रक्रिया करण्यासाठी आता वयाचे देखील बंधन नसून अगदी ८५ वर्ष वयाच्या रुग्णांवर देखील यशस्वी शस्त्रक्रिया येथे करण्यात आली आहे.
मृदू स्वभाव, रुग्णांना वेळ देत त्यांना सरळ सोप्या भाषेत समजावून सांगणे या डॉ विशाल यांच्या पध्दतीने ते रुग्णात लोकप्रिय आहेत. अद्ययावत तंत्रज्ञान, डॉक्टरांची कुशलता व सुसज्ज रुगणालय या त्रिसूत्रीनेच नाशिकच नव्हे तर नाशिक बाहेरूनही जसे धुळे, जळगाव, ठाणे येथूनही अनेक रुग्ण कासलीवाल हॉस्पिटल येथे उपचार घेत आहेत.
http://www.kasliwalhospital.com/