जीवनात यशस्वी होण्यासाठी लहानपणी झालेले जीवनमूल्यांचे संस्कार, कुटुंबातून मिळालेले प्रोत्साहन तसेच ध्येय ठरवण्यासाठी मिळालेली प्रेरणा ही प्रमुख्याने कारणीभूत असते. ग्रामीण भागात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन शालेय शिक्षण लहान गावात घेतल्यानंतर पुढील पूर्ण शिक्षण मेरीटवर पूर्ण करून अकरा वर्षापासून आयुर्वेदाच्या माध्यमातून हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करणाऱ्या नाशिक मधील सुप्रसिद्ध अष्टांग आयुर्वेद सुपरस्पेशलिटी हॉस्पिटलच्या डॉ. प्रवीण केंगे यांचा हा जीवनप्रवास.
डॉ. प्रविण केंगे यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळस येथे शेतकरी कुटुंबात झाला .वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी त्यांना बाल दम्याचा खूप त्रास झाला. अनेक प्रकारचे उपचार केले पण यश आले ते आयुर्वेदिक उपचाराला.
बस…. आयुर्वेद म्हणजे असाध्य रोगावरील परिणामकारक उपचार हे बालमनावर बिंबले. त्याच सोबत ग्रामीण भागातील त्यावेळची परिस्थिती बघून ‘‘मोठा हो व डॉक्टर होऊन रोग्यावर उपचार कर” असा आशीर्वाद आजीने दिला. मग काय मोठा होऊन काय व्हायचे हे बालपणी ठरले.
शालेय शिक्षण प्रवरानगर येथे पूर्ण झाल्यानंतर आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आयुर्वेद या वैद्यकीय शाखेची पुढील शिक्षणासाठी निवड केली. पदवीचे शिक्षण घेता घेता अनेक तज्ञांकडे प्रशिक्षण देखील घेतले तसेच पदवी पूर्ण झाल्यावर अनेक पदव्युत्तर कोर्सेस जसे पोस्ट ग्रॅज्युएशन इन चाइल्ड हेल्थ, पोस्ट ग्रॅज्युएशन इन स्कीन डिसीज, योगा , ज्योतीष विशारद व एमडी (आयुर्वेद ) देखील पूर्ण केले.
पाच हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास असलेल्या आयुर्वेदाच्या अथांग ज्ञानाचा फायदा रुग्णांना होण्यासाठी 2009 मध्ये अष्टांग आयुर्वेद हे क्लिनिक सुरू केले पण आयुर्वेद योगा व निसर्ग उपचार असा एकत्रित उपचार करण्यासाठी मोठ्या जागेची आवश्यकता होती. त्यामुळे 2013 मध्ये नाशिकच्या चेतना नगर येथे अष्टांग आयुर्वेद मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल ची सुरुवात करण्यात आली. हा प्रवास येथेच न थांबवता शहरातील गंगापूर रोड भागातही दुसरी शाखा कार्यान्वयित करण्यात आली. आपली जन्मभूमी म्हणजेच निफाड तालुक्यातील पिंपळस येथे चार एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत देखील हॉस्पिटल उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे.
मी बघितल्या रुग्णांपैकी सुमारे 80 ते 85 टक्के रुग्ण हे मधुमेह, रक्तदाब ,थायरॉईड ,सोयरासिस, कोलेस्ट्रॉल, यूरिक ॲसिड ,संधिवात ,आम्लपित्त या व्याधीने ग्रस्त आहेत .योग्य उपचार न केल्याने हे रोग मुळापासून बरे न होता उलटपक्षी त्यासाठी घेतलेल्या औषध व उपचारांनी अन्य आजार सुरू होत आहेत. रोगांच्या समूळ उच्चाटन साठी आयुर्वेद ही एकमेव योग्य उपचार पद्धती आहे.
डॉ. प्रवीण केंगे
अष्टांग मधील एकाच छताखाली मिळणारे उपचार-
१. स्री व पुरुष यांच्यासाठी वेगवेगळी पंचकर्म
२. तणाव डिप्रेशन ताण यासाठी अध्यात्माची जोड देऊन शिरोधारा उपचार.
३. वंध्यत्व निवारणासाठी संशोधन केंद्र.
४. प्रसूतिपूर्व गर्भसस्कार व प्रसूतीनंतर योग्य संगोपन.
५. पॅरॅलिसिस साठी मसाज तसेच ॲक्युपंक्चर व ॲक्युप्रेशर उपचार.
६. मनस्वास्थ्य साठी योग उपचार.
७. सर्व असाध्य रोगांसाठी परिपूर्ण उपचार.
या सर्व उपचारांनी असंख्य रुग्ण बरे झाले असून याकरिता डॉ. प्रविण केंगे यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे. सध्या सुरू असलेल्या कोविंड साठी प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी हॉस्पिटल तर्फे एक विशेष पॅक देखील तयार करण्यात आला आहे.
प्रत्येकाच्या आयुष्यात आयुर्वेद पोहोचणे जेणेकरून शरीर व मन शुद्धीकरण करून त्यांना निरोगी ठेवणे या या उद्देशासाठी डॉ. प्रवीण केंगे परिश्रम घेत आहेत. अधिक माहिती http://www.ashtangaayurved.com/