टेस्टी फुड व तेही हेल्दी ..कसे? दोन मैत्रिणींची यशोगाथा.

Advertisements

जिभेचे चोचले पुरवताना त्या पदार्थांनी शरीराला अपाय तर होणार नाही ना???

हे टेस्टी वाटणारे फुड हेल्दी पण आहे का???

तयार करताना खरंच नैसर्गिक घटक वापरले आहेत काय???


असे एक ना अनेक प्रश्न. या सर्वांवर उत्तर  हवय?? टेस्टी पण हेल्दी पदार्थ खायचेत?? मग नाशिक मधील महात्मा नगर येथील राईट बाईट ला अवश्य भेट द्यायला हवी.


डायट फुड म्हणजे आरोग्याला चांगले असे फुड.  पण नुसते याचे नाव जरी ऐकले तरी त्यात चव नसणार हे गृहीत धरले जाते. पण हेच फुड  चविष्ट पण बनवता येऊ शकते ते देखील सर्व नैसर्गिक व ताजे घटक वापरून  आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्याला अपायकारक घटक जसे मैदा, प्रिझर्वेटिव्ह व कृत्रिम रंग पूर्णपणे टाळून . असा  हा हेल्दी  व  टेस्टी मेनू पूर्ण अभ्यास करून तयार केला आहे राइट बाईट येथे आणि या हेल्दी  व टेस्टी पदार्थाने नाशिककरांना अल्पावधीतच भुरळ घातली आहे हे नक्की.


मैत्रीच्या बंधाला अशा या पौष्टिक व चवदार व्यवसायात  गुंफणाऱ्या  दोन मैत्रिणी तृप्ती वर्तक व चित्रा थत्ते यांची ही यशोगाथा.  मूळ मुंबईच्या तृप्ती आपले पती महेश यांच्यासोबत नाशिकला स्थायिक  झाल्या.येथे हे त्यांचे पारिवारिक संबंध जोडले गेले ते योगेश व चित्रा थत्ते यांच्यासोबत. दोन्ही परिवारांना चांगले खाऊ घालण्याची हौस. याच हौसेचे रूपांतर व्यवसायात करायचे ठरवले. अनेक पर्याय शोधले व ठाण्याच्या गायत्री गोखले अनेक वर्षांपासून यशस्वीरित्या चालवत असलेल्या राईट बाईट ची फ्रॅंचाईजी नाशिक मध्ये घेण्याचे ठरले, 1 फेब्रुवारी 2020 रोजी या आरोग्यदायी चवदार यात्रेचा शुभारंभ झाला.

चवीची जाण असलेल्या नाशिककरांनी अगदी पहिल्या दिवसापासून राईट बाईटला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाचे  सर्वात महत्वाचे कारण म्हणजे इथला हटके मेनू.

– तृप्ती वर्तक व चित्रा थत्ते

अगदी सूप या पासूनच वेगळेपणाची सुरुवात. नेहमीचेच  ठराविक सूप न देता आरोग्यदायी असे मोरिंगा म्हणजेच शेवग्याचे सूप, स्पिनाच म्हणजे पालकाचे सूप,मशरूम सूप, स्वीट कॉर्न बेसिल सूप, पमकिन म्हणजे भोपळ्याचे सूप. 

या  सोबत अगदी आधुनिक म्हणजे पिझ्झा , पास्ता ,विविध प्रकारचे सँडविच तसेच अनेक पारंपारिक महाराष्ट्रीयन पदार्थ देखील.पण पिझ्झा ,पास्ता व सँडविच  देखील आरोग्यदायी म्हणजेच मैदा विरहित ब्रेड पासून. तो ब्रेड देखील कणकीपासून व तोही अगदी खास तयार करून घेतलेला . या शिवाय ग्रीन मुंग शोरबा,टोमोटो शोरबा  असे  आरोग्यवर्धक व तोंडाला पाणी  आणणाऱ्या असंंख्य पदार्थांची रेलचेल.अनेक खवय्यांच्या आवडीचे नॉनव्हेज पदार्थ पण येथे उपलब्ध असून  तेदेखील त्याचे  योग्य ते वेगळेपण जपून.


संपूर्ण हायजिन बाळगून सद्यस्थितीत होम डिलिव्हरी व टेक अवे सुविधादेखील येथे उपलब्ध.अशा या टेस्टी व हेल्दी फुडची भुरळ आबालवृद्धांना पडली आहे.

मग कधी येताय राईट बाईट ला???

3 thoughts on “टेस्टी फुड व तेही हेल्दी ..कसे? दोन मैत्रिणींची यशोगाथा.

Leave a Reply

You cannot copy content of this page